बाळासाहेबांबद्दल बोलल्यास खबरदार - मनसे
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी बाळासाहेबांविरोधात अपशब्द वापरल्यानंतर आता पक्षातील मतभेद विसरत मनसेने पुन्हा एकदा आझमींना इशारा दिला आहे. आझमींना महाराष्ट्रात फिरायचे असेल तर त्यांनी तोंड आवरावे असे मनसे नेते बाळा नांदगावकरांनी त्यांना सुनावले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळात झालेल्या गदारोळास आझमीच जबाबदार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना आझमी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरले.
याचे पडसाद आता उमटत असून, शिवसेनाप्रमुखांना काहीही बोललेले खपवून घेणार नसल्याचे नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनाप्रमुख आजही आमचे दैवत असून, आझमींना मुंबईमध्ये, महाराष्ट्रात राहायचे असेल तर त्यांनी आपल्या तोंडाला लगाम घालावा असा इशारा त्यांनी दिला आहे.