Festival Posters
✕

काय, स्मरणशक्ती वाढवताय?

Updated: बुधवार, 17 फेब्रुवारी 2010 (19:02 IST)
स्मरणशक्ती ही उपजत असते, कोणत्याही औषधाने ती वाढवता येत नाही. मात्र आपल्यात आहे त्या स्मरणशक्तीचे योग्य व्यवस्थापन करून आपण तिला चांगल्याप्रकारे वळन देऊन तिचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी करू शकतो.
आपल्या मेंदूला शब्दापेक्षा चित्र व प्रतिमा लक्षात ठेवणे सोपे जाते. म्हणून फोटोग्राफिक मेमरी म्हणजे तल्लख स्मरणशक्ती असते. त्यामुळे वस्तूचे नाव लक्षात ठेवण्यापेक्षा त्याच्या प्रतिमेवर लक्ष केंद्रीत करावे. स्मरणशक्ती वाढविण्‍यासाठी काही प्रयोग करता येतात...
1) वस्तुंची लांबलचक यादी लक्षपूर्वक वाचा. क्रम बदलू नका. यातील प्रत्येक वस्तूचा पुढच्या वस्तूशी काहीतरी संबंध जोडा. तो जितका अतार्किक, अवास्तव, गंमतीशीर असेल तितके ते बरे. हे चि‍त्र तयार झाले की, नावे त्याच क्रमाने धडाधडा म्हणता येतील. तेव्हा त्या वस्तू पाहण्याची आवशक्यता भासणार नाही.
2) बॅंकचे चौदा आकडी खाते क्रमांक अथवा मोबाईलचा दहा आकडी क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी त्याचे तुकडे पाडा. प्रत्येक तुकड्यातील आकड्यांचा परस्परांशी काहीतरी संबंध लावा. क्रम, सम-विषम, गुणाकार, बेरीज, अशा गणितातल्या सोप्या संज्ञांचा त्यासाठी वापर करता येईल.
3) नव्याने ओळख झालेल्याशी बोलताना शक्य तितक्या वेळ त्याचे नाव उच्चारा. मग ते पक्के लक्षात राहते. त्याच्या चेहर्‍यातला वेगळेपणा जाणून घ्या. लांब नाक, मोठे डोळे, पिंजारलेले केस आदींचे मनातल्या मनात कार्टून तयार करून घ्यावे.
4) अभ्यास करतानाही अधिक चित्रे, नकाशे, आकृत्या, काढण्याची सवय लावा. ही चित्रकला सुबक नसली तरी स्मरणा काम त अचून करते, यात मात्र शंका नाही.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

बाजारचा केमिकलमुक्त लसूण कशाला हवा? घरच्या घरी लसूण उगवण्याची सर्वात सोपी पद्धत!

Beauty Tips: वधूच्या मेकअप किटमध्ये या पाच लिपस्टिक शेड्सचा आवर्जून असायलाच हवा

भाजीला काही नसेल तर १० मिनिटांत बनवा झणझणीत 'हिरव्या लसणाचा ठेचा'

नैतिक कथा : प्रेम आणि जबाबदारी....गोष्ट इवल्याश्या मासोळीची

नेहमीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग बनवा हे चटपटीत 'भरलेले टोमॅटो'! एकदा नक्की ट्राय करा

Show comments