ganesh chaturthi
✕

सा‍नियाची नजर ओलिंपिक पदकावर

Written By भाषा
Updated: गुरूवार, 15 नोव्हेंबर 2007 (11:27 IST)
भारतीय टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्जा हिला वयाच्या 21व्या वर्षात पुढील वर्षी होणार्‍या बीजींग ओलिंपिक खेळांमध्ये पदक जिंकून उच्च कामगीरी करून दाखवायची इच्छा आहे. भारतीय टेनिसला एका नविन उंचीवर पोहोचवणार्‍यात महत्त्वाची भूमिका करणारी ही टेनिस सम्राज्ञी गुरूवारी आपला 21वा वाढदिवस साजरा करणार आहे.

NDND
जखमी झाल्यामुळे ती सध्या टेनिस पासून लांब आहे. परंतू तिने मोहालीत खेळल्या गेलेल्या पाक विरूध्द एकदिवसीय क्रिकेट सामन्या दरम्यान दर्शक म्हणून पोहचून सर्वांचे लक्ष स्वत:कडे आकर्षित केले. पाकचा गोलंदाज शोएब अख्तरच्या आक्रमकतेची चाहती असलेली सानिया डब्ल्यूटीए एकल रँकिंग मध्ये 32व्या स्थानावर तर युगल रँकिंगमध्ये 18व्या स्थानावर पोहचली आहे.

PTIPTI
भारतीय टेनिस मध्ये सौंदर्य भरणारी व एका चीनी पत्रिकेत जगातील टेनिस खेळांडूंमध्ये पहिल्या दहा सुंदर महिलांमध्ये मानाचे स्थान मिळविणार्‍या सानियाचे पुढील वर्षी चीनमध्येच होणार्‍या ओलिंपिक खेळावर लक्ष आहे. सानियाने एका टीवी चँनलला दिलेल्या साक्षात्कारात सांगितले कि ती ओलिंपिक मध्ये खेळायला अतिशय उत्सूक आहे. कारण ओलिंपिक मध्ये ती पहिल्यांदाच खेळणार आहे. व हा तिचा पहिलाच चीन दौरा असणार आहे. त्याठिकाणी पदक जिंकणे हे तिचे पहिले ध्येय असेल.

कधी आपल्या पेहरावामुळे तर कधी केशरचनेमुळे नेहमी चर्चेत रहाणार्‍या सानियासाठी हे वर्ष खुप छान राहिले. 15 नोव्हेंबर1986 त मुंबईत जन्मलेली सानिया ग्रँड स्लैम टूर्नामेंट मधये वरिष्ठता प्रात्प करणारी सानिया पहिली भारतीय खेळाडू आहे. सानिया रिकाम्या वेळेत जाहिरातींच्या शुटींगमध्ये व्यस्त असते. ती चित्रपटात आगमन करत आहे यावरही चर्चा रंगली. या वर्षी तीने खुप उच्चतम खेळाडूंना हरविले आहे. यात मार्टिना हिंगीस, दिनारा साफिना, पैटी श्नाइडर व सहर पीर सामिल आहेत.

NDND
ही टेनिस स्टार देशातील लहानांपासून वृध्दांपर्यंत सगळांची आवडती खेळाडू आहे. फँशनच्या काळात या खेळाडूने नविन पिढीमध्ये नथ व ग्राफिटी लिहीलेला टीशर्ट लोकप्रिय केला आहे. सानिया हे वर्ष सगळ्यात चांगले मानते कारण या वर्षाच्या सुरूवातीला ती 70व्या स्थानावर होती व वर्षाच्या शेवटी ती 27व्या स्थानावर पोहचली. ही प्रगती कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानास्पद आहे.

दुहेरी खेळात सानियाचा खेळ खुप छान झाला. तिला वाटते यामुळे तिच्या एकेरी प्रदर्शनावर फरक पडला. व या अनुभवातून ती बरेच काही शिकली. खाण्यात बिर्याणी आवडणारी सानिया या वर्षी 27व्या स्थानावर पोहोचली. या आधी 2005 मध्ये ती अमेरीका ओपनच्या चवथ्या फेरीत पोहचली होती. व इथवर पोहचणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. डिसेंबरमध्ये होणार्‍या होपमैन कपच्या स्पर्धेत ती रोहन बोपन्ना सोबत भारताचे प्रतिनिधीत्त्व करेल. या जोडीला सातवे स्थान दिले गेले आहे. या स्टार खेळाडूसाठी तिचे जखमी होणे ही मोठी समस्या असते. जखमी असल्या कारणाने तीला खुपदा महत्त्वपूर्ण टूर्नामेंटला मुकावे लागते.

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

४८,००० कोटींच्या पर्ल्स ग्रुप घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई; मालमत्ता केली जप्त

LIVE: पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला; सीजेपीच्या आंदोलनामुळे अनेक गाड्या रद्द

'गरबा पार्टनर ऑन रेंट' संकल्पनेवर वाद; भोपाळमध्ये हिंदू संघटना आक्रमक, पोलिस आयुक्तांना दिले निवेदन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या राज ठाकरे यांच्या भेटीवर रोहित पवार यांचा घणाघात

Maharashtra Weather Updates महाराष्ट्रातील उष्णतेचा पारा वाढतोय; पुढील काही दिवस हवामान कसे राहणार?

Show comments