Dharma Sangrah
✕

पुण्यात 'कॉकरोच जनता पार्टी'चे आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी खुला अल्टिमेटम

Updated: गुरूवार, 11 जून 2026 (15:09 IST)
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात एका वेगळ्याच आणि अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' नावाच्या एका संघटनेने पुण्यात आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास देशाची राजधानी दिल्लीतही मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा या संघटनेने दिला आहे.
 
नक्की काय आहे हे आंदोलन?
'कॉकरोच जनता पार्टी' ने नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी पक्ष ११ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर आंदोलन केलं जात आहे. दीपक यांनी इशारा दिला आहे की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास २० जूनपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
 
नाव ऐकून जरी हे आंदोलन विनोदी वाटत असले, तरी त्यामागील हेतू गंभीर आणि जनतेशी जोडलेला आहे. या संघटनेने समाजातील भ्रष्टाचार, वाढती महागाई, बेरोजगारी आणि प्रशासकीय अनास्थेवर अत्यंत खोचक आणि उपरोधिक पद्धतीने बोट ठेवले आहे.

ज्याप्रमाणे 'कॉकरोच' (झुरळ) हे कितीही कठीण परिस्थितीत किंवा घाणीत स्वतःला जिवंत ठेवते, त्याचप्रमाणे देशातील सामान्य जनताही सर्व प्रकारच्या समस्या, भ्रष्टाचार आणि अडचणींचा सामना करत कशीबशी जिवंत आहे, हे दर्शवण्यासाठी त्यांनी या नावाचा वापर केला आहे.
 
आंदोलकांचे काय म्हणणे आहे?
पुण्यातील या आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सामान्य जनतेचा आवाज सरकार आणि प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीये. राजकारणी केवळ स्वतःचा विचार करत असून सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
 
अभिजीत दीपके म्हणाले की, या आंदोलनादरम्यान पेपरफुटीच्या घटना आणि शिक्षण क्षेत्रातील आवश्यक सुधारणांबाबत एक जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. ते म्हणाले, "आमचे आंदोलन गेल्या १५ दिवसांपासून सक्रिय असून, आम्हाला शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांबाबत आवाज उठवायचा आहे. आम्हाला थोडा वेळ हवा आहे; शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास केल्यानंतरच आम्ही ही लढाई लढत आहोत."

पुण्यातून सुरुवात: आंदोलकांनी स्पष्ट केले की, पुण्यातून सुरू झालेले हे आंदोलन केवळ एक सुरुवात आहे.
 
दिल्लीत आंदोलनाचा इशारा: जर प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांची दखल घेतली नाही आणि व्यवस्था सुधारली नाही, तर आगामी काळात 'कॉकरोच जनता पार्टी' थेट दिल्लीत जाऊन संसद भवन किंवा जंतरमंतरवर मोठे जनआंदोलन उभे करेल.
 
प्रशासकीय ढिसाळ कारभाराविरोधात शांततापूर्ण पण उपरोधिक मार्गाने आवाज उठवण्याच्या या पुणेरी स्टाईल आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

LIVE: मुंबईतील मुसाफिरखाना मशिदीवर बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला स्थगिती

नागपुरात कार दुभाजकावर आदळून पुलावरून थेट नाल्यात कोसळली; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्राच्या ऊसदराचा कर्नाटकला फटका; सीमाभागातील ऊस महाराष्ट्राकडे

पैशांसाठी माणुसकी मेली; ४ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करून अवयव काढले, ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments