Dharma Sangrah
✕

पुण्यात DRDO संचालकाला ATS कडून अटक, हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय

Updated: शुक्रवार, 5 मे 2023 (07:42 IST)
 
प्रदीप कुराळकर हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट (इंजिनिअर्स) या विभागात काम करतात. प्रदीप कुरुळकर हनी ट्रॅपमधे अडकून पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांसोबत व्हिडीओ चॅट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे फेब्रुवारी महिन्यात भारतीय गुप्तचर संस्थांना लक्षात आले होते. त्यानंतर यासंबंधीची माहिती DRDO ला देण्यात आली. DRDO च्या व्हिजिलन्स विभागाने या प्रकरणाचा तपास केला आणि एक अहवाल तयार केला. या अहवालाच्या प्रती विविध भारतीय तपास यंत्रणांना देण्यात आल्या.
 
या अहवालाची प्रत मिळाल्यानंतर महाराष्ट्र ATS ने या प्रकरणाचा तपास केला आणि डॉक्टर प्रदीप कुरुळकर यांना अटक केली. डॉक्टर प्रदीप कुरुळकर हे या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. मात्र ते पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांच्या संपर्कात आल्याच तपास यंत्रणांना आतापर्यंतच्या तपासात आढळून आलं आहे. डॉक्टर प्रदीप कुरुळकर यांनी कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली? याचा तपास आता एटीएस कडून केला जातो आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

मालेगाव तालुका सुन्न: मेंढ्या धुताना पाझार तलावात बुडून एकाच घरातील तीन पिढ्यांचा अंत

LIVE: एटीएम रिकामे, व्हीआयपी दर्शन बंद! नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये रोख रकमेचा तुटवडा

नोव्हाक जोकोविचने राफेल नदालचा विक्रम मोडला, उपांत्य फेरी गाठली

अमेरिकेच्या किनारपट्टीजवळ वैद्यकीय विमान कोसळले, विमानातील सर्वजण बेपत्ता

मुंबई काँग्रेस कार्यालयात पोलिसांची बेकायदेशीर घुसखोरी! विद्यार्थ्यांची अटक

पुढील लेख
Show comments