Festival Posters
✕

पुण्यात पाण्यासाठी भाजपचे आंदोलन, महापालिकेकडून गुन्हा दाखल

Updated: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (08:29 IST)
 
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह त्यांची आई नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, वृषाली कामठे, मनीषा कदम आणि नगरसेवक वीरसेन जगताप यांना अटक करण्यात आली.
 
शहराच्या दक्षिण भागात असलेल्या कात्रज, कोंढवा, वानवडी आदी परिसराला वडगाव जलशुद्धीकरण केंद्रामधून पाणी पुरवठा केला जातो. परंतु, मागील काही महिन्यांपासून हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासोबतच या भागातील नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही हाती काहीच लागत नसल्याने भाजपाने माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट पाणीपुरवठा विभागात आंदोलन केले.
 
हे आंदोलन सुरू असताना कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांच्याशी आंदोलकांची खडाजंगी झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना संभाजी आणि शिवीगाळ करण्यात आली तसेच कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना स्वारगेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.  
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

कुत्र्याच्या नखाचा ओरखडा दुर्लक्ष करणे जीववर बेतले, १४ वर्षांच्या मुलाच्या रेबीजने मृत्यू

सारा तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त सचिन भावूक; बाप-लेकीच्या नात्याबद्दल व्यक्त केला खास संदेश

LIVE: नाशिक कुंभमेळा स्थळाजवळील भूजलात कर्करोगाशी संबंधित विषारी रसायन आढळले

६७,१०० रुपयांत भन्नाट फीचर्स! नवीन LED लूकसह TVS Radeon मार्केटमध्ये दाखल

गोवा नाईटक्लब आग : लुथरा बंधूंनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख द्यावे! मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

पुढील लेख
Show comments