Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात स्वयंघोषित बाबाचा भयंकर कारनामा; १५ वर्षे लैंगिक शोषण, लघवी पिण्यास भाग पाडले, पीडितेचा आरोप

Updated: गुरूवार, 18 जून 2026 (19:16 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात एका स्वयंघोषित बाबाच्या लज्जास्पद कृत्यांचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. एका ४१ वर्षीय महिलेने आरोप केला आहे की, बाबाने १५ वर्षे तिचे लैंगिक शोषण केले आणि तिला मानसिक व शारीरिक छळ केला. पोलिसांनी हरियाणाचा रहिवासी असलेल्या राधामोहन मिश्रा आणि त्याच्या सात साथीदारांना अटक केली आहे. महिलेने बनावट बाबावर अनेक गंभीर आरोप केले आहे. 

महिलेने कोणते आरोप केले?
पीडित महिलेचा आरोप आहे की, बाबाने १५ वर्षे तिचे शोषण केले. तिच्या म्हणण्यानुसार, तिला त्याचे मूत्र पिण्यास भाग पाडले गेले, विजेचे धक्के दिले गेले आणि सतत मानसिक छळ केला गेला. तिचा असाही आरोप आहे की, तिच्यावर पतीपासून विभक्त होण्यासाठी दबाव आणला गेला आणि त्याची मालमत्ता तिच्या नावावर हस्तांतरित करण्याचे प्रयत्न केले गेले. ती बराच काळ भीती आणि दबावाखाली जगली.
ALSO READ: कारखाने, शेतकरी, मच्छीमारांचा माल योग्य मूल्यावर विकला जाईल; भारत आणि यूके व्यापारी संबंधांमध्ये नवीन अध्याय सुरू होणार
सिंहगड रोडवर राहणाऱ्या एका ४१ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. तक्रारीनंतर, पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री उशिरा वाघोलीच्या उबळनगरमधील एका बंगल्यावर छापा टाकला. पोलीस आयुक्त कुमार यांनी सांगितले की, मूळचा हरियाणाचा असलेला राधामोहन मिश्रा गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहत होता. तो याच बंगल्यातून आपला आश्रम चालवत होता. स्वयंघोषित बाबा राधामोहन मिश्रा, त्याचा साथीदारआणि सहा महिला साथीदारांना अटक करण्यात आली. न्यायालयाने सर्व आरोपींना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ALSO READ: मुंबईतील पाणीटंचाई अधिकच गंभीर! स्विमिंग पूल आणि बांधकाम स्थळांवरील पाणीपुरवठा स्थगित, नवीन मार्गदर्शक सूचना जारी
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments