Festival Posters

पुण्यात पावसाने भरलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Updated: शुक्रवार, 3 जुलै 2026 (16:23 IST)
ALSO READ: पुणे हत्या प्रकरणात केतनला ढकलण्यापूर्वी सियाने त्याचा फोन मागितला, पोलिसांच्या तपासात आढळले
असा आरोप आहे की, कंत्राटदाराने सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी खोदलेले खड्डे बॅरिकेड्स किंवा सूचना फलक न लावता उघडेच ठेवले होते. त्यात पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  
 
सदर घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडलाय येथे सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी चार मोठे खड्डे खणले होते. नंतर हे काम अपूर्ण सोडले आणि खड्ड्याच्या आजू-बाजूला कोणतीही सुरक्षा उपाय योजना केली नव्हती. पावसामुळे हे खड्डे पाण्याने तुंबले होते. ज्यामुळे त्याची खोली तपासता आली नाही. 
ALSO READ: पुण्यात झोपलेल्या मजुराला जेसीबीने चिरडले! पुरावे नष्ट करण्याचा आरोप; ५ जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान दोन वर्षाचा चिमुकला घराच्या बाहेर खेळत असताना तो पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडला. घरच्यांना तो पडल्याची माहिती मिळाल्यावर उशीर झाला होता. स्थानिकांच्या मदतीने मुलाला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.   दोन वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबात खळबळ उडाली. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, खड्ड्यांभोवती अडथळे लावलेले नव्हते किंवा कोणतेही चेतावणी फलक लावलेले नव्हते. 
ALSO READ: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलच्या वकिला कडून साहिल गोयलला १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस
 प्राथमिक तपासात निष्काळजीपणा झाल्याचेही उघड झाले आहे. या घटनेनंतर लोणी काळभोर पोलिसांनी एका अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याएजन्सीने खड्डे खोदले, हे काम कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आले होते आणि सुरक्षेच्या मानकांचे पालन का केले गेले नाही, हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहे..  
Edited By - Priya Dixit 
 
About Author
प्रिया दीक्षित
प्रिया दीक्षित गेल्या ५ वर्षांपासून मीडिया क्षेत्रात कार्यरत असून सध्या त्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात Junior Sub Editor म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील प्रतिष्ठित जिवाजी विद्यापीठातून होमसायन्समध्ये पदवी आणि हिंदी या भाषत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तसेच त्यांच्याकडे कॉम्प्युटरचा डिप्लोमा देखील आहे. सनसनाटी पसरवण्याऐवजी प्रत्येक.... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments