Festival Posters

पंजाबी छोले

ND
साहित् य : 3 वाट्या काबुली चणे, 2 कांदे, 2 टोमॅटो चिरलेले, 2 हिरव्या मिरच्या, बोटभर आलं, 1 चमचा धणे, 1/2 चमचा जिरे, 4 लवंगा, दालचिनीचा तुकडा, 4 मोठ्या विलायची, 7-8 मिरे, 1/2 चमचे शाह जिरे, 3 तमालपत्रं, 1 चमचा तिखट, चिमूटभर हळद, 1 चमचा अणारदाणा, चिमूटभर सोडा, बारीक चिरून कोथिंबीर, 1 चमचा तूप, चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा साखर.

कृत ी : अदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात चिमूटभर सोडा घालून चणे भिजत ठेवावे. सकाळी त्याच पाण्यात तमालपत्र, वेलची, मिरे घालून चणे शिजवून घ्यावे. कांदे, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या वाटून घ्यावात. लवंग, दालचिनी, धने, जिरे, शाहजिरे या मसाल्याची पूड करून घ्यावी. उरलेला मसाला, वेलची, मिरे व तमालपत्र तुपावर परतावे. नंतर त्यात कांदा घालून परतावे. दोन मिनिट टोमॅटो घालून हलवावे. टोमॅटोच्या सुटलेल्या रसात हळद, तिखट, मसाला पावडर, दोन चमचे बारीक कुटलेला अनारदाणा घालावा. 3‍ मिनिटाने त्यात शिजलेले छोले, मीठ, गूळ पाणी घालून गॅसवर शिजत ठेवावे. उकळून दाटसर झाल्यावर खाली उतरवून कोथिंबीर भुरभुरावी. गरमागरम छोले भटुर्‍यासोबत सर्व्ह करावे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

क्रिस्पी क्रीम रोल रेसिपी, घरी सहजपणे बनवण्याची सोपी पद्धत येथे पहा

काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने खरंच नुकसान होते का? तज्ज्ञ काय सांगतात

बारावीनंतर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे? डिप्लोमा, पात्रता, कॉलेज आणि लाखोंच्या पगाराची संपूर्ण माहिती

सकाळी उठल्यावर चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी करा हे उपाय

लघु कथा : गरुड आणि कोंबडी; गोष्ट सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची

Show comments