Marathi Biodata Maker
✕

Four Day Dry Day राज्यात महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांचा ड्राय डे जाहीर

Updated: मंगळवार, 13 जानेवारी 2026 (17:57 IST)
ALSO READ: महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता थांबणार, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली
महापालिका निवडणुका शांततेत पार पडाव्यात आणि मतदार निर्भयपणे मतदान करू शकावेत, यासाठी पुढील चार दिवस राज्यातील संबंधित महानगरपालिका क्षेत्रात ड्राय डे काटेकोरपणे राबवला जाणार आहे.
 
महापालिका निवडणुकांचा प्रचार आज 13 जानेवरी रोजी संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. कोणत्याही प्रकारचे आमिष, गैरप्रकार किंवा मतदारांवर प्रभाव नको पडायला या साठी मद्यविक्रीवर बंदी घेतली असून चार दिवसांचा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. 
ALSO READ: नागपुरात लाखो रुपये रोख, शस्त्रे आणि ड्रग्ज जप्त
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसह एकूण 29 महानगरपालिकांच्या हद्दीत पुढील चार दिवस दारूची दुकाने, बार आणि मद्यविक्री केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत, त्या सर्व भागांत हा नियम लागू राहणार आहे.
ALSO READ: "महाराष्ट्रातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीचे महापौर असतील," भाजपच्या मंत्रींचा दावा
या निर्णयाबाबत मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांना व व्यावसायिकांना आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट, अधिकारी लंडन दौऱ्यावर? आदित्य ठाकरेंचा उदय सामंत यांना सवाल

LIVE: दुष्काळाच्या काळात अधिकाऱ्यांच्या लंडन दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उदय सामंतांना प्रश्न

खाजगी ट्रॅव्हल्समधून अवैध वसुली केल्याप्रकरणी एपीआय रवींद्र शेडगे यांचे निलंबन

चंद्रपूर येथील सैनिक शाळेतील पाचवीच्या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वे कडून अनेक गाड्या रद्द

पुढील लेख
Show comments