1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (10:55 IST)

विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण

जळगाव : जळगावातील एका खाजगी क्लास मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  हा मुलगा या शिक्षिकेकडे खासगी शिकवणीसाठी येत होता. ही शिक्षिका त्याला नेहमी मारहाण करत असल्याची तक्रार त्याने आपल्या पालकांकडे केली होती. पीडित मुलगा हा नऊ वर्षाचा आहे.
 
मुलाच्या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे पाहण्यासाठी पालकांनी अचानक क्लास मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मुलाला आणि शिक्षकेला न सांगता पालक अचानक क्लासमध्ये गेले. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
 
अचानक क्लास मध्ये गेल्यावर समोर जे दिसल ते पाहून पालकांना मोठा धक्का बसला. सदर शिक्षिका या नऊ वर्षाच्या मुलाचे कपडे काढून त्याला बुक्क्यांचा मार देत होती. मुलगा रडत होता. तरी ही शिक्षिका मुलाला मारतच होती. मुलाच्या पालकांनी हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये कैद केला. यानंतर त्यांनी थेट शिक्षकेविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.