ganesh chaturthi
✕

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Updated: बुधवार, 17 जानेवारी 2018 (16:03 IST)

आमदार बच्चू कडू आणि त्यांचे काही सहकारी २४ मार्च २०१६ रोजी परतवाडा येथील एस. टी. डेपो चौकातून जात होते. बस डेपोजवळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या होत्या. यावरुन बच्चू कडू यांनी तिथे ड्यूटीवर असलेले वाहतूक पोलीस इंद्रजित चौधरी यांना जाब विचारला. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करत बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंद्रजित चौधरी यांना शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. या प्रकरणी चौधरी यांनी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम ३५३ (सरकारी कामात हस्तक्षेप), ३३२, १८६ अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची अचलपूरमधील न्यायालयात सुनावणी सुरु होती. बुधवारी न्यायालयाने बच्चू कडू यांना दोषी ठरवले. कडू यांनी एक वर्षांचा तुरुंगवास आणि ६०० रुपयांचा दंड देखील ठोठावला.

याआधीही आरोप करत कडू यांनी मार्च २०१६ मध्ये मंत्रालयात उपसचिवाला मारहाण केली होती. तर जुलै २०१७ मध्ये अपंग पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणीवरुन त्यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरही हात उगारला होता.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: हिंगोली जिल्ह्यात एकापाठोपाठ दोन भूकंपांचे धक्के जाणवले

शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ – तिसऱ्या टप्प्यात ३.२७ लाख शेतकऱ्यांना ₹३१६० कोटी!

हॉटेलमध्ये २६ वर्षीय तरुण आणि ४६ वर्षीय महिलेचे मृतदेह आढळले; ९ दिवसांसाठी बुक केली होती खोली

ज्ञानू नाही तर नंदू राजीनामा देतील! अभिजीत दीपके यांचा इशारा, तर मुख्यमंत्री फडणवीसांना खुले आव्हान

"पीक वाया गेले, कर्ज कसे फेडू?"; लातूरमध्ये नैराश्यातून ६० वर्षीय शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

पुढील लेख
Show comments