Biodata Maker marathi
✕

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ, बांगलादेशच्या आयसीटीने दुसरे अटक वॉरंट जारी केले

Updated: मंगळवार, 7 जानेवारी 2025 (19:04 IST)

आयसीटीने हसीनाविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अवामी लीग सरकारच्या विरोधात प्रचंड निदर्शने झाली होती. यानंतर हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्या पळून भारतात आल्या . त्यानंतर आयसीटीने त्याच्यावर तीन गुन्हे दाखल केले आहेत.  
 
आयसीटी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'न्यायाधीश एम.डी. गुलाम मुर्तझा मजुमदार यांनी फिर्यादीची बाजू ऐकल्यानंतर अटक वॉरंट जारी केले. पोलीस महानिरीक्षक (IGP) यांना शेख हसिना यांच्यासह 12 जणांना अटक करून 12फेब्रुवारी रोजी न्यायाधिकरणासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे प्रकरण शेकडो लोकांच्या जबरदस्तीने बेपत्ता झाल्याच्या तक्रारींशी संबंधित आहे. हसीनाचे माजी संरक्षण सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) तारिक अहमद सिद्दिकी आणि माजी आयजीपी बेनझीर अहमद यांच्यासह इतरांचीही या प्रकरणात नावे आहेत. सिद्धिक सध्या कोठडीत आहे, तर अहमद फरार समजला जात आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रो स्टेशनची नावे बदलणार! फडणवीस यांनी विशेष समिती स्थापन केली

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

LIVE: मुंबईतील मुसाफिरखाना मशिदीवर बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला स्थगिती

नागपुरात कार दुभाजकावर आदळून पुलावरून थेट नाल्यात कोसळली; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्राच्या ऊसदराचा कर्नाटकला फटका; सीमाभागातील ऊस महाराष्ट्राकडे

पुढील लेख
Show comments