suvichar
✕

'सीएम टू पीएम' शेतकरी आसुड यात्रा गुजरात पोलिसांनी अडविली

Updated: गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:09 IST)
बळसाणे जि.धुळे येथे सकाळी सभा झाली.नवापूर जि.नंदूरबार येथे महाराष्ट्र पोलिसांनी गुजरात सिमेवर शेतकरी आसुड याञा दीड तास अडविली.दरम्यान गुजरात पोलिस मोठा फौजफाटा घेवून रस्त्यावर दाखल झाले.बारडोली येथे गुजरातच्या शेतकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती.माञ तिकडे जाण्यास पोलिसांनी मनाई केली.टोलनाक्याशेजारील शेतात सर्व शेतकरी एकञ जमले असतानाच पोलिसांनी धरपकड सुरु केली.जेवण टोलनाक्यावर आलेले असतानाच पोलिसांनी प्रहारचे आ.बच्चू कडू,देवेंद्र गोडबोले,शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील,कालिदास आपेट,दिनकर दाभाडे यांना अटक केली.
 
आ.बच्चू कडूंना ताब्यात घेताच प्रहार शेतकरी संघटनेच्या सुरेखा ढवळे यांनी सहकाऱ्यांसह पोलिस कारवाईला विरोध केला.त्यावेळी पोलिसांनी अपंग महिलांनाही ओढत आणून गाडीत कोबले.कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करुन पोलिस व्हॅनमध्ये घातले.नरेंद्र मोदी यांचे गाव वडनगर येथे रक्तदानाला गुजरात सरकारने परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी सांगितले.वेगवेगळ्या पोलिस व्हनमधुन महाराष्ट्र,गुजरातमधिल सुमारे 500 महिला,पुरुष,अपंग कार्यकर्त्यांना अटक करुन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ठेवले आहे.
कालिदास आपेट 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

श्रीलंकेने ४३० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला २ गडी राखून पराभूत करून इतिहास रचला

अभिषेक शर्माने १२ चेंडूंमध्ये २९ धावा करून इतिहास रचला

जिओ आयपीओने इतिहास रचला, पहिल्यांदाच अर्जांची संख्या 1 कोटींच्या पार

७.० तीव्रतेच्या भूकंपाने तिबेट उद्ध्वस्त; अनेक इमारती ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या, १६ जणांचा मृत्यू

शरद पवार यांनी कराळे मास्तर यांना बाहेरचा रस्ता दाखवला! ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली

पुढील लेख
Show comments