सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (09:36 IST)

डीजें साउंड सिस्टीम व्यावसायिकांनी 15 ऑगस्ट ‘नो साउंड डे’ घोषित केला

दहीहंडी, गणेशोत्सव यासारखे सण तोंडावर आले आहेत. मात्र या सणांना साऊंड सिस्टीम देणार नसल्याचा निर्णय नाशिक,मुंबई आणि पुण्यातील  येथील साऊंड सिस्टीम मालकांनी घेतला आहे.न्यायालयाने घालून दिलेली डेसिबलची मर्यादा आणि ती उलटल्यास होणारी कारवाई, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा 75 डेसिबलपेक्षा अधिक असता कामा नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  त्याचा निषेध नोंदविण्यासाठी साउंड सिस्टीम व्यावसायिकांनी 15 ऑगस्ट ‘नो साउंड डे’ घोषित केला आहे. साउंड सिस्टीम वेल्ङ्गेअर असोसिएशन नाशिकनेही पाठिंबा दिला आहे.

दहीहंडी व सार्वजनिक उत्सवात आवाजाची मर्यादा ही 75 डेसिबल इतकी असावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यापेक्षा जास्त आवाज असल्यास न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान म्हणून संबंधितांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे या निर्णयाचा विरोध दर्शविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी व सणासुदीला साउंड सिस्टीम न देण्याचा निर्णय प्रोफ्रेशनल ऑडिओ लायटिंग असोसिएशनने (पाला) मुंबई यांनी घेतला आहे.
मंगळवारी (दि.15) राज्यभरात दहीहंडीचा सण साजरा होणार असून, त्या दिवशी नो साउंड डे पाळण्याचा निर्णय साउंड सिस्टीम व्यावसायिकांनी घेतला आहे.