Daily Horoscope
✕

"आयटी कंपन्यांमधील धर्मांतर रॅकेट खपवून घेतले जाणार नाही," नाशिक प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

Updated: गुरूवार, 9 एप्रिल 2026 (18:43 IST)
ALSO READ: नाशिक : एका मोठ्या आयटी कंपनीत धर्मांतर रॅकेट: ९ पीडित समोर; सहा टीम लीडर्सना अटक
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नाशिक येथील एका प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतराच्या धक्कादायक खुलाशांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली पहिली तीव्र प्रतिक्रिया देताना, याला "एक गंभीर संघटित कट" म्हटले आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात, विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात असे कोणतेही रॅकेट खपवून घेतले जाणार नाही.
 
नाशिकमधील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात ६ संशयितांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त  यांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
 
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “एका तंत्रज्ञान कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. नाशिक पोलिसांनी ज्या तत्परतेने हे प्रकरण उघडकीस आणले ते कौतुकास्पद आहे.” त्यांनी सूचित केले की, प्रशासन याकडे केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून नव्हे, तर बेरोजगार आणि गरजू हिंदू महिलांना लक्ष्य करणाऱ्या जिहादी टोळीची एक संघटित कारवाई म्हणून पाहत आहे.
 
तपासात उघड झाले आहे की, कंपनीचे 'टीम लीडर्स' आणि वरिष्ठ अधिकारी गेल्या पाच वर्षांपासून हिंदू पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. गरजू मुलींना नोकरीचे आमिष दाखवून नोकरीवर घेतले जात होते आणि नंतर त्यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात होता.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, केवळ महिलाच नव्हे तर पुरुष कर्मचारीही या टोळीचे बळी ठरले. साताऱ्यातील एका तरुणाला नमाज पठण करण्यास, कलमा शिकण्यास आणि रमजानमध्ये उपवास करण्यास भाग पाडले गेले. मांसाहार केल्याबद्दलही त्याचा छळ करण्यात आला.
 
या टोळीचे कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा मोठ्या नेटवर्कशी संबंध आहेत का, याची एसआयटी सखोल चौकशी करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: गोंदियात रानटी हत्तींचा धुमाकूळ! ३२ हत्तींच्या कळपाने पिकांचे केले मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

राज्यात १२ वर्षांखालील मुलांना पालकांशिवाय एकट्याने लिफ्ट किंवा एस्केलेटर वापरण्यास सक्त मनाई

अक्कलकोटमध्ये एफडीएचा मोठा छापा; स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो मिठाई जप्त, चार दुकानांना टाळे

भाच्यासोबतच्या अनैतिक संबंधांतून आत्याची निर्घृण हत्या; दोन बहिणींसह चौघे अटकेत

LIVE: अदानींच्या तराली प्रकल्पावर वन विभागाची कारवाई; १,५०० मेगावॅटचा प्रकल्प स्थगित

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणखी २ हजारांची मदत मिळण्याची शक्यता; राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष

पुढील लेख
Show comments