यापूर्वी जे शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटले होते, त्या शेतकऱ्यांनी, मुख्यमंत्रांना भेटायला गेलेल्या शेतकऱ्यांविरोधा निदर्शने केली. तसंच आम्ही संपावर ठाम असल्याचं काही गावकऱ्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला यापेक्षा अधिक मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यापेक्षा कमीच मागण्या मान्य झाल्या, असं म्हणत पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याच गावातील कोअर कमिटी सदस्यांचा निषेध केला.
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दोन महिन्यांचा अवधी दिला होता, मात्र ही कोअर कमिटी कोणताही ठोस निर्णय न घेता मागे आली. तसंच ग्रामसभा घेऊन संप मागे घ्यायचा की नाही हे ठरलं होतं, मात्र त्यांनी तिकडेच संप मागे घेत असल्याचं जाहीर केल्याने, आम्ही त्यांचा निषेध करतो, असं गावकरी म्हणाले. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीनं संप मागे घेतलेला नाही.