अहमदनगरयेथे रुग्णालयातील भीषण आगीत अनेकांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयाच्या आय़सीयूमध्ये भीषण आग लागून अकरा जण होरपळले असल्याची प्राथमिक माहिती मिळत मिळत आहे. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज सकाळी ही आग लागली आहे. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ICU विभागाला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आहे. मात्र अचानक आग लागल्याने रुग्णालयातील रुग्ण दुसऱ्या ठिकाणी हलावताना सिव्हिल कर्मचारी यांची धावपळ झाली आहे. माहितीनुसार, २० रुग्ण या ICU विभागात असल्याचे बोलले जात आहे.