Festival Posters

नागपूरमध्ये पुराचा हाहाकार

Updated: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (18:34 IST)
 
शासनाच्या विविध विभागांमार्फत शहरात बचाव कार्य सुरू आहे.
 
शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजल्यानंतर विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने नागपुरकरांची झोप उडवली. सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
 
अंबाझरी, गोरेवाडा हे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने जवळच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शहरातील नाग नदी आणि पिवळी नदी दुथडी भरून वाहत आहेत.
 
शहरांच्या अनेक भागात गाड्या वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
 
शनिवारी (23 सप्टेंबर) सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास 106.7 मिमी इतका पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुसळधार पावसाने शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शहरातील मुख्य बस स्थानक मोर भवन येथे बसेस पाण्याखाली गेल्या आहेत.
 
शंकर नगर, वर्मा ले आऊट, पडोळे चौक, पंचशील चौक या भागात प्रचंड पाणी साठलं आहे.
 
मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा
नागपूर शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
धोकादायक घरे आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तात्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या.
 
तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
 
पाण्याची पातळी वाढल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्यांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 
नागपुरातील परिस्थितीवर लक्ष - फडणवीस
महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी विपिन इटणकर, आणि इतर पदाधिकारी परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं आहे.
 
“एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.. मुक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
 
नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे/ अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत.
 
शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे,” ही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

उपोषणाचा आज १३ वा दिवस, जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांना इशारा

LIVE: राज्य सरकार कडून नाशिक सिंहस्थ कुंभासाठी १,८०० कोटी रुपयांना मंजुरी

छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज चोरी कोण करत आहे हे आता एआय उघड करणार

एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपरफुटीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, वाहतुकात बदल

पासवर्ड तयार करताना बहुतेक लोक या तीन चुका करतात! या गोष्टी ठेवा लक्षात

पुढील लेख
Show comments