Dharma Sangrah
✕

अनैतिक संबंधातून प्रेयसीची चाकूने वार करून हत्या; विवाहित प्रियकराने स्वतःवरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला, नागपुरातील घटना

Updated: बुधवार, 19 ऑगस्ट 2026 (15:28 IST)
आरोपीवर वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ते दोघे रेल्वेमध्ये एकत्र काम करत होते. दरम्यान, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले
ALSO READ: महाराष्ट्रात २८ ऑगस्टपासून धर्मस्वातंत्र्य कायदा लागू होणार
सोमवारी आरोपीने मनीषनगरच्या एका हॉटेलात खोली बुक केली.यासोबतच त्याने डेकोरेटरकडून खोलीत फुगेही लावून घेतले होते. मंगळवारी दुपारी २ वाजता ते दोघे हॉटेलच्या खोलीत गेले.यानंतर ते दोघे खोलीतून बाहेर आले नाहीत.  
ALSO READ: महाराष्ट्रातील सर्व ऑटो-रिक्षा चालकांना मराठी बोलता येणे बंधनकारक आहे; परवाना देताना मराठी चाचणी घेतली जाईल
नंतर आरोपीने संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांना फोन करून हॉटेल मध्ये बोलावले त्याच्या बोलण्यावरून मित्रांना संशय आला. रात्री ९ वाजेच्या सुमारास मित्र हॉटेलात गेले आणि दार ठोठावले. दार आतून बंद होते. काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने  हॉटेल व्यवस्थापनाला कळवले. डुप्लिकेट चावीने कुलूप उघडण्यात आले, पण ते आतून बंद होते.
ALSO READ: पुणे: खड्ड्यामुळे बाईक घसरली! ट्रकच्या चाकाखाली आल्याने वडिलांच्या डोळ्यांदेखत ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
अखेर दरवाजा उघडण्यात आला, आणि दोघेही रक्ताने माखलेले आढळले. शिवानीचा गळा चाकूने चिरलेला होता आणि ती मृत पडली होती.आरोपीच्या मानेवर चाकूने चिरल्याचे वार होते. हाताची नस कापलेली होती. पण तो शुद्धीवर होता. त्याला तात्काळ वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांना संशय आहे की, किरणने शिवानीवर वार केल्यानंतर तिच्या हातात चाकू ठेवला. या घटनेमागील खरा हेतू किरणच्या चौकशीनंतरच समोर येईल. तिच्यावर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते आणि त्याची  प्रकृती गंभीर होती. पोलीस पुढील तपास करत आहे .
Edited By - PriyaDixit

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? अजित पवारांचे नाव देण्याच्या चर्चेवर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

मराठी जनतेने भाजपच्या सापळ्यात अडकू नये! छठपूजेच्या वादावरून राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

वृंदावनचे कथाकार इंद्रदेव यांच्यावर बलात्काराचा आरोप; महाराष्ट्रातील महिलेची ठाण्यात तक्रार

Xiaomi 18 Pro Series : शाओमीचा मोठा धमाका, १७ नोव्हेंबरला ७ नवीन उत्पादने लॉन्च होणार

पुढील लेख
Show comments