Marathi Biodata Maker

गोव्यातही धरणे ८० टक्क्यांवर…

सोमवार, 24 जुलै 2017 (08:27 IST)
राज्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बहुतेक सर्व महत्त्वाच्या  धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ती ८० टक्के भरली आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत धरणे ओसंडून वाहू लागतील,  अशी माहिती जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
धरणांच्या पातळीत वाढ झाल्याने तसेच पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे सिंचनात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाना आवश्यक ते सहकार्य  देण्यास जलस्रोत खाते नेहमीच तत्पर राहील,  असेही पत्रकात म्हटले आहे.
 
आकडेवारीनुसार राज्यातील साळावली,  अंजुणे,  आमठणे, चापोली व पंचवाडी या पाच महत्त्वाच्या धरणांमधील पाण्याच्या पातळीत मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे वाढ झाली आहे. या धरणांच्या पाण्याची पातळी वाढून ती 80 टक्क्यांहून अधिक झाली आहे. साळावली धरणाची क्षमता 41.15 मीटर इतकी असून 21 जुलै रोजी 40.24  मीटर  पर्यंत धरण भरल्याची नोंद  झाली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी साळावली धरणाची ही पातळी 40.57 मीटर इतकी नोंद झाली होती.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

अकोल्यात काँग्रेस नेते याकूब खान पहलवान यांचे निधन

चंद्रपूरमध्ये सर्पदंशामुळे ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले

LIVE: मुंबईच्या चेंबूर परिसरात एका स्कूल व्हॅनवर झाड कोसळले

महाराष्ट्रात मासेमारी बंदी ७६ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली; सागरी जैवविविधता आणि मत्स्य उत्पादनाला चालना मिळणार

वनप्लस नॉर्ड N6 5G 8,000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेऱ्यासह 19,999 रुपयांना लॉन्च

पुढील लेख
Show comments