शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2017 (22:16 IST)

एप्रिल पासून गोदावरी प्रदूषण करणाऱ्याना दंड

उच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे आता महापालिका गोदावरी प्रदूषण करण्याऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करणार आहे. ही दंडात्मक कारवाई एक एप्रिल पासून लागू होणार आहे. यामध्ये नदीपात्रात कोणत्याही प्रकारे घाण अथवा अशुद्धता करता येणार नाही.या प्रकारचे आदेश महापलिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे.
 
गोदावरी नदी पात्रात कचरा टाकणारे, कपडे व वाहने धुवणारे यांच्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यात पहिला गुन्हा करणार्‍यास 1 हजार आणि त्यानंतर त्याच व्यक्तीने दुसर्‍यांदा हा गुन्हा केल्यास त्यास 5 हजार रुपये दंड केला जाणार असल्याची माहिती आज महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.या अगोदर नाशिक पोलिसांनी अनेक वेळा कारवाई केली होती मात्र कोणताही फरक पडत नव्हता, त्यामुळे आता दंडाची रक्कम वाढवली असून माजी सैनिकांची मदत घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.