Marathi Biodata Maker

नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर काठावरील मंदिरे बुडाली, धरणातून पाण्याचा विसर्ग

Updated: सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (10:23 IST)
 
नाशिक शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. रविवारपासून गंगापूर धरणातून सुमारे साडेआठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून रामकुंडावरील अनेक मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. तसेच गंगापूर धरणासह इतर धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिकचा पूरमापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे.
 
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरीतील हर्णै आणि पालघरमधील डहाणू येथे 116 मिमी आणि 143 मिमी पाऊस झाला आहे. तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथे 43 मिमी तर नांदेड व परभणी येथे 48 मिमी व 55 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
 
तसेच हवामान खात्याने महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई आणि लव्हलिना यांना मोठी जबाबदारी दिली

६ बंडखोर खासदार शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, सभापती बिर्ला यांनी विलीनीकरणाला मंजुरी दिली

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर

श्रीलंका दौऱ्यासाठी पाकिस्तान महिला संघ जाहीर, संघातून ८ खेळाडूंना वगळले

अण्णा हजारे यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला आणि सरकारला कडक इशारा दिला

पुढील लेख
Show comments