रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (16:05 IST)

दरवर्षीप्रमाणे पदवीच्या परीक्षा होणार : उदय सामंत

पदवीच्या परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यासह विद्यार्थ्यांनी परिक्षेसंदर्भात कोणताही संभ्रम ठेवू नये तसेच दरवर्षी ज्याप्रमाणे पदवी परीक्षा घेतली जाते त्याप्रकारेच यंदाही पदवीची परीक्षा होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 
 
पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, १ ऑक्टोबरला परीक्षा झाल्यास १० तारखेला निकाल जाहीर केला जाईल, तात्काळ निकाल देण्यासाठी यंत्रणा उभारणीचं काम सुरू आहे.  यावेळी ११ हजार विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परिक्षा घेतल्या जाणार आहेत. तर नापास विद्यार्थ्यांची परीक्षा पुढील १ महिन्यात घेण्यात येणार आहे. यापैकी ९० ते ९२ टक्के विद्यार्थी ही पदवी परीक्षा ऑनलाईन माध्यमातून देतील. ही ऑनलाईन परीक्षा घेताना प्रकृतीची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी न करता चांगल्या, आनंदपूर्व वातावरणात विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
 
निकालावर कोणताही शेरा लागणार नाहीते असेही म्हणाले की, पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे कोरोना दरम्यान होणाऱ्या परीक्षेच्या निकालावर कोणताही शेरा लागणार नाही असे त्यांनी सांगितले.