सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (09:29 IST)

Maharashtra Rain मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
 
 राज्यात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.