Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरात कर्जामुळे तणावात येऊन कंत्राटदाराची गळफास घेत आत्महत्या

Updated: मंगळवार, 2 सप्टेंबर 2025 (16:29 IST)
तणावाखाली येत कंत्राटदार  पेनमाचा वेंकटेश्वर वर्मा उर्फ मुन्ना वर्मा यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्मा यांनी विविध सरकारी खात्यांमध्ये काम केले होते.
ALSO READ: निलंबित पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; बीडमधील घटना
या कामासाठी सरकारचे त्यांच्यावर 30 ते 40 कोटी रुपये देणे होते. हे काम करण्यासाठी त्यांनी बाजारातून कर्जही घेतले होते. हे कर्ज फेडू न शकल्याने वर्मा तणावाखाली होते. वर्मा यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी हैदराबादमध्ये राहतात. कधीकधी ते नागपूरला येतात आणि तिथेच राहतात आणि कधीकधी वर्मा त्यांच्यासोबत राहण्यासाठी हैदराबादला जातात.
ALSO READ: भंडारा येथे अवैध दारूविरुद्ध पोलिसांची मोहीम, ७८ हजारांहून अधिक किमतीची दारू जप्त
सदर घटना सोमवारी सकाळी त्यांचे मित्र त्यांच्या घरी गेल्यावर उघडकीस आली. अनेकदा दार ठोठावून देखील आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने सुरक्षा रक्षकाला बोलावण्यात आले त्यांनी देखीलआरडा ओरड करत दार उघण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांना देखील काहीच प्रतिसाद मिळाला नाही. घराच्या कुलुपाची चाबी दररोज काम करणाऱ्या मावशींकडे असायची. मावशींशी संपर्क साधून कुलूप उघडल्यावर घरात मयत मुन्ना वर्मा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. 

सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले. घरात पोलिसांना झडती घेतल्यावर कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. 
ALSO READ: नागपूरहून कोलकाता जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाची पक्ष्याशी टक्कर, आपत्कालीन लँडिंग
पोलिसांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून कुटुंबीयांतील सदस्यांचे जबाब नोंदवले आहे. वर्मा यांच्या मित्रांची आणि जवळच्या लोकांची चौकशी केल्यावर ते कर्जबाजारीमुळे तणावात असल्याचे समजले. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या३,२७७ च्या पार

आपला मोबाईल चार्जर दुसऱ्या कोणाला त्यांचा मोबाईल चार्ज करण्यासाठी देत ​​असाल, तर या गोष्टी माहित असणे आवश्यक

मुंबईत डासांचा प्रादुर्भाव वाढला! मलेरियाचे रुग्ण ३,२७७ च्या पार तर स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ

पुणे: खड्ड्यामुळे बाईक घसरली! ट्रकच्या चाकाखाली आल्याने वडिलांच्या डोळ्यांदेखत ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पडीक जमिनीवर सुवर्णसंधी! करा कोरफडीची शेती आणि मिळवा मोठा नफा

पुढील लेख
Show comments