सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (10:30 IST)

स्वातंत्र्यदिनी विदेशी महावाणिज्यदूत तसेच अन्य मान्यवरांना स्नेहभोजन, चहापान रद्द - मुख्यमंत्री

राज्यात महापूर स्थिती आणि त्यामधून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच अन्य मान्यवरांना स्नेहभोजन आणि स्वातंत्र्य दिनी सायंकाळी आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम यावर्षी रद्द केलाय. 
 
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच इतर मान्यवरांना स्नेहभोजन तसेच स्वातंत्र्य दिनी सायंकाळी मुंबई शहरातील मान्यवरांसोबत स्नेहोपहार असे महत्वाचे दोन कार्यक्रमांचे मुख्यमंत्र्यांकडून दरवर्षी आयोजन करण्यात येते. मात्र सध्या राज्याच्या काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती व त्यातून काही निष्पाप व्यक्तींचा झालेला मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी 14 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित स्नेहभोजन आणि दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी मंत्रालय प्रांगणात आयोजित स्नेहोपहार कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.