Festival Posters
✕

जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला

Updated: बुधवार, 29 मे 2024 (16:45 IST)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रायगडाच्या महाड येथे चवदार तळ्यावर जाऊन  मनुस्मृतीचं धन करत सरकार विरोधात आंदोलन केलं या वेळी त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेल्या पोस्टरला फाडले. या प्रकारामुळे आणि आंदोलनामुळे अजित पवार गट आक्रमक झाला आहे. 

ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात अजित पवार गटाने आंदोलन केलं. आवाहाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. या बाबत आनंद परांजपे म्हणाले, महाड येथील चवदार तळ्याजवळ जे काही जितेंद्र आव्हाड यांनी केले त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेल्या पोस्टरला फेडण्याचे कृत्य केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना महाड पोलिसांनी अटक करण्याची मागणी केली आहे. 

यावरून राज्याचे राजकारण नव्यानं तापले असून आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले आहे जाहीर निषेध!जाहीर निषेध!स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी.

डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील, असंही ते म्हणाले आहेत.
 
 यावरून जितेंद्र आव्हाडांनी जाहीर माफी मागितली असून ते म्हणाले, भावनेच्या भरात मनुस्मृतीविरुद्ध आंदोलन करत असताना मनुस्मृती हा शब्द लिहिला होता म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्याच्यावर बाबासाहेबांचा फोटो आहे हे लक्षातच आले नाही.मनुस्मृती जाळू नये या साठी विरोधक राजकारण करत आहे. माझ्या हातून चूक झाली मी त्याची अत्यन्त लिन होऊन माफी मागतो. असे ते म्हणाले.
 
Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

कमी खर्चात घ्या लाखो रुपयांचे उत्पादन: स्ट्रॉबेरी लागवड पूर्ण माहिती

छत्रपती संभाजीनगर प्राणिसंग्रहालयात १७ वर्षीय 'सिद्धार्थ' वाघाचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? रामदास आठवले यांचा धाडसी दावा

अंडर 19 आशिया चषकासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, सेहवाग-द्रविडच्या मुलांनाही संघात स्थान

रिलायन्सचा तिमाही नफा विक्रमी ₹२९,५५० कोटी, जिओ आणि तेल-केमिकल व्यवसायाला गती

पुढील लेख
Show comments