रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (09:38 IST)

तहानलेल्या लातूरला आठवड्यात दोनदा पाणी

रेल्वेतील पाणी वाटपामुळे आणि भयानक दुष्काळ सहन केल्यामुळे पूर्ण देशात लातूर भूकंपानंतर चर्चेत आले होते. मात्र पूस योग्य झाला आणि पिण्याची पाण्याची चिंता कमी झाली. त्यामुळे आता येत्या १५ जानेवारीपासून लातुरकरांना आठवड्यातून दोनवेळा पाणी पुरवठा केला जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एकूण ४७ विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरात १४ ठिकाणी नव्याने सिग्नल बसवणे, अण्णाभाऊ साठे नगरात साठेंच्या नावाने कमान उभी करणे, कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्वासित लाभ दिले जातील, प्रमुख रस्ते आणि चौकांना नावे देणे, ऑक्सिजन पार्क उभे करणे, मुलांसाठी चिल्ड्रन पार्क उभारणे, अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावाने दरवर्षी साहित्य कला क्षेत्रात उत्तम काम करणार्‍या व्यक्तीस ५१ हजार रुपये आणि मानचिन्ह प्रदान करणे, पे अ‍ॅंड पार्क कामास मुदतवाढ देणे आदी विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.