Festival Posters
✕

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी बातमी! आज प्रसिद्ध होणार Draft Voter List; नाव तपासा

Updated: सोमवार, 31 ऑगस्ट 2026 (11:39 IST)
४ नोव्हेंबर २०२६: अंतिम मतदार यादीची (Final Voter List) अधिकृत प्रसिद्धी
 
असे तपासा मतदार यादीत तुमचे नाव
ऑनलाइन पद्धत: 
निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in किंवा ceo.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
'Search in Electoral Roll' या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा EPIC नंबर (मतदार ओळखपत्र क्रमांक) टाकून नाव शोधा किंवा वैयक्तिक माहिती (नाव, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ) भरून तपासणी करा.
 
ऑफलाइन पद्धत:
नागरिक आपल्या स्थानिक बीएलओ (BLO - Booth Level Officer) किंवा तहसील कार्यालयात जाऊन प्रसिद्ध झालेली यादी पाहू शकतात.
यादीत नाव नसल्यास किंवा माहिती चुकली असल्यास काय करावे?
नवीन नोंदणीसाठी (फॉर्म ६): यादीत नाव नसल्यास किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण झाली असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अथवा ऑफलाईन फॉर्म नंबर ६ भरून नाव नोंदवता येईल.
दुरुस्तीसाठी (फॉर्म ८): नाव, पत्ता, वय किंवा फोटोमध्ये बदल किंवा दुरुस्ती करायची असल्यास फॉर्म नंबर ८ भरावा.
नाव वगळण्यासाठी / हरकतीसाठी (फॉर्म ७): मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींचे नाव वगळण्यासाठी फॉर्म ७ चा वापर करावा.
 
महत्त्वाचे आवाहन: आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी सर्व मतदारांनी आपले नाव प्रारूप यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments