शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (08:57 IST)

मुंबईत शनिवार व रविवारी मोर्चे काढा, वाहतूक कोंडी अधिक होणार नाही

लोकशाहीत मोर्चे व आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. मात्र शनिवार व रविवारी मोर्चे काढल्यास मुंबईत वाहतूक कोंडी अधिक होणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. मंत्रालयापर्यंत येणाऱ्या मोर्चांमुळे वाहतुकीची कोंडी होते. मोर्चे आझाद मैदानात थांबवा, अशी मागणी करणारी याचिका चर्चगेट रहिवाशी संघाने केली आहे. या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दिवसेंदिवस मोर्चांची संख्या वाढत आहे. राज्यभरातून निघणारे मोर्चे थेट आझाद मैदानावर येऊन धडकतात. याला निर्बंध घालणे आवश्यक आहे, अशी मागणी अॅड.एस. सी. नायडू यांनी केली.