Festival Posters

येत्या 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा

बुधवार, 24 मे 2017 (16:59 IST)
येत्या 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने  मुंबईतील सम्राट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.  सर्व आचारसंहितांचे पालन करून हा महामोर्चा काढला जाईल. ९ ऑगस्टला क्रांतिदिनी पहिला मोर्चा निघाला होता. म्हणून मुंबईतील महामोर्चा ९ ऑगस्टला काढणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले.  या मोर्चासाठी वातावरणनिर्मिती व्हावी यासाठी ६ जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचे निमित्त साधत गावोगावी महामोर्चाची माहिती देण्यासाठी व्यापक अभियान सुरू केले जाणार आहे. तर १३ जुलैला कोपर्डी येथील क्रांती ज्योतीला श्रद्धांजलि वाहून अभियानाचा आढावा घेतला जाईल. दरम्यान, सरकारला हुंडाबंदी, शेतकऱ्यांच्या विषयांना आणि आंदोलनांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे समन्वय समितीने  यावेळी सांगितले. त्याबरोबरच यंदाच्या शैक्षणिक वर्षात मराठा विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफीसह उच्च शिक्षणात सवलत देण्याची मागणी केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

प्रकाश आंबेडकर यांनी स्मार्ट मीटर विरोधात आंदोलनाची घोषणा केली

विधवा माता आणि धाडसी महिलांना मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी जाहीर केले

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून विरोधी पक्षांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल

LIVE: प्रकाश आंबेडकर यांनी स्मार्ट मीटरविरोधात आंदोलनाची घोषणा केली

गोंदियात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत, २८ जून रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचे दोन थेंब देणार

पुढील लेख
Show comments