रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (21:13 IST)

नाशिकमध्ये कमाल तापमानात वाढ, सायंकाळनंतर गारठा

cold
नाशिकसह परिसरात सायंकाळनंतर गारठा वाढत आहे. दिवसाच्या सुरवातीला पारा काही अंशांनी वाढून दुपारी सामान्‍य स्‍थिती होत असल्‍याचा अनोखा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. दरम्यान मंगळवारी  किमान तापमान 12.6 इतके नोंदविले गेले. तर सोमवारी  पाऱ्यात पुन्‍हा एकदा घसरण होऊन किमान तापमान 12.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. मात्र दिवसाच्‍या प्रखर सूर्यकिरणांमुळे कमाल तापमानात वाढ नोंदविली असून, सोमवारी (ता. 25) हे तापमान 31.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
 
यंदाच्‍या हिवाळी हंगामात कधी गारठा तर कधी सामान्‍य वातावरण, अशी अनुभूती येते आहे. गेल्‍या 16 डिसेंबरला पारा घसरून यंदाच्‍या हंगामातील नीचांकी किमान तापमान 12.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.
 
मात्र पारा वाढत गेल्‍याने गेल्‍या दहा दिवसांपासून सरासरी किमान तापमान 14 अंश सेल्सिअसच्‍या जवळपास राहात होते. दुसरीकडे कमाल तापमानातही मोठी तफावत बघायला मिळत होती. सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत असल्‍याने किमान तापमानात घट, तर दुपारी प्रखर सूर्यकिरणांमुळे कमाल तापमानात वाढ नोंदविली गेली आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor