1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2016 (17:01 IST)

एमपीएससीची वयोमर्यादा वाढवली मात्र अंमलबजवणी नाही

राज्यात घेण्यात येत असलेल्या आणि प्रशासकीय अधिकारी होण्याकरिता महत्वाची असलेल्या एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत 5 वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. मात्र तसे काही  प्रत्यक्षात दिसला नाही. यामध्ये  बुधवारी झालेल्या पीएसआय परीक्षेच्या जाहिरातीत कमाल वयोमर्यादा 28 वर्ष इतकीच कायम ठेवण्यात आली आहे. ,मागील  अडीच वर्षे या पदाची जाहिरात आलेली नाही. मात्र सरकारने वयोमर्यादा वाढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी जोरात  तयारी सुरु केली होती. पण सध्याच्या जाहिरातीत वयाच्या अटीत काहीच बदल न केल्यानं विद्यार्थ्यांचा नाराज झाले आहेत.  तर मुख्यमंत्री  यांना निव्दन दिले जाणार असून निर्णय घेतला नाही तर अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.