Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आगामी एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

Updated: मंगळवार, 10 जानेवारी 2017 (16:54 IST)
 
एमपीएससीतर्फे २१ नोव्हेंबर २0१६ रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात विक्रीकर निरीक्षक- २०१६ या पदाची पूर्वपरीक्षा २९ जानेवारी रोजी, तर मुख्य परीक्षा २८ मे रोजी घेतली जाणार असल्याचे नमूद केले होते; परंतु विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा २८ मेऐवजी ३ जून रोजी घेतली जाईल. त्याचप्रमाणो राज्य उत्पादन शुल्क गट 'क' दुय्यम निरीक्षकपदाची पूर्वपरीक्षा २ जुलै रोजी व मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर रोजी घेतली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, आता या पदाची पूर्व परीक्षा २८ मे रोजी, तर मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी घेतली जाईल.
 
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१७ या पदाची पूर्वपरीक्षा ४ जून रोजी, तर मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती; परंतु बदललेल्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर रोजी होईल. विक्रीकर निरीक्षक व वन सेवा पदाच्या पूर्व परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, शासनाकडून निश्‍चित कालावधीत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच वेळापत्रकानुसार पदे जाहीर करून परीक्षा घेतली जाईल असेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

अकोल्यात FDA ची मोठी कारवाई, ब्लिंकिटसह मुंबईतील दोन हॉटेल्सचे परवाने निलंबित; सांगलीत १६५ लिटर भेसळ दूध नष्ट

एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील हिला नंदुरबारमध्ये अटक

महाराष्ट्र सरकारने अमली पदार्थांविरोधात मोठा निर्णय घेतला, आता सर्व विभाग एकत्र येऊन अमली पदार्थांची साखळी तोडणार

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीची चिन्हे; यूबीटीचे १४ आमदार शिंदे गटात सामील होऊ शकतात! नेत्याचा मोठा दावा

चंद्रपूरमध्ये आश्रम शाळेतील विद्यार्थी जेवणानंतर आजारी पडले, जेवणात पाल आढळल्याने घबराट

पुढील लेख
Show comments