गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री राणेंच्या घरी

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर धरला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणपतीच्या दर्शनासाठी नारायण राणे यांच्या घरी गेले होते. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली असून फडणवीस आणि राणे यांचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केले आहे.
 
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. राणेंनीही याविषयी प्रतिक्रिया दिलेली नाही. ही चर्चा रंगली असतानाच शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नारायण राणे यांच्या निवासस्थानी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री गणपतीचं दर्शन घेत असतानाचा एक फोटोही ट्विट केला आहे.