Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील सर्वाधिक कमी तपमानाची नोंद निफाडला

Updated: शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (11:20 IST)
 
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष बागा या निफाड तालुक्यात आहेत. राज्यात सातत्याने नीचांकी तपमानाची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी, पिंपरी, सुकेणे, चांदोरी, कोकणगाव, पिंपळगाव या भागात होत आहे. त्यामुळे थंडीमुळे निफाड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. निफाड तालुक्यासह कादवा, बाणगंगा, गोदा खोऱ्यात थंडीचा जोर कायम आहे. पिंपळगाव, निफाड, सुकेणे, ओझर या भागातील द्राक्षांना या थंडीचा फटका बसत आहे. सुरुवातीला पडलेली थंडी ही  द्राक्षासाठी पोषक होती. मात्र पारा सातत्याने खाली गेल्याने द्राक्ष फुगवणीवर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी द्राक्ष मणी फुटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतीदार चिंतेत सापडला आहे. अनेक द्राक्ष बागामध्ये तापमान वाढवण्यासाठी  शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तर काही बागायतीदारांनी बागे भवती मोठ मोठी कापडे गुडाळली आहेत. जेणेकरून द्राक्षाना थंडी कमी लागेल. शहरी भागात लोक गरम कपडे दिवसभर परिधान करून ठेवत आहेत. रस्त्यावर गर्दी कमी झाली आहे. दिवसभर चहाच्या टपर्यांवर गर्द्री दिसत आहे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

International Literacy Day 2026: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस

धक्कादायक! शाळेत १३ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; वॉशरूममध्ये आढळला मृतदेह

महाराष्ट्र सरकार ५८ लाख कुणबी नोंदी सार्वजनिक करणार, विखे पाटील यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान

LIVE: ५८ लाख कुणबी नोंदी सार्वजनिक केल्या जाणार, मराठा आरक्षणावर विखे पाटील यांचे मोठे विधान

नाशिकच्या ठक्कर बाजार स्थानकावर बसची धडक बसल्याने १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत

पुढील लेख
Show comments