Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन्ही कंपन्यांकडून उत्तर आलेलं नाही : टोपे

Updated: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (16:19 IST)
 
“आपण सर्वच जण १ मे ची वाट पाहत आहेत १८ ते ४४ वर्षाच्या लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर टाकण्यात आलीय. ही जबाबदारी स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आम्ही मंत्रीमंडळाला एक नोट तयार करुन पाठवली आहे. यामध्ये मोफत दिली तर किती खर्च, काही घटकांना मोफत दिली तर किती खर्च यासंदर्भातील वेगवेगळे पर्याय आणि आकडेवारी देण्यात आलीय,” असं टोपे म्हणाले.
 
पुढे बोलताना “आम्ही खरेदी करायला तयार आहोत. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर व्यास यांनी आम्ही कोव्हिशिल्डसाठी सीरमला आणि कोव्हॅक्सिनसाठी भारत बायटेकला पत्र लिहिले आहेत मागील दोन दिवसांपासून काहीच रिप्लाय आलेला नाही. आम्ही स्पष्ट सांगितलं आहे आम्हाला बारा कोटी लसी हव्या आहेत. तुम्ही कशा देणार, किती रुपयांना देणार, आम्ही पैसे कसे देऊ त्याचं शेड्यूल कसं असणार अशी विचारणा राज्य सरकारकडून करण्यात आलीय. या मागणीचा अर्थच एवढाय की या पत्राच्या माध्यमातून आम्ही लसीकरणांसाठी कटीबद्ध आहोत हे दिसून येत आहे,” असं टोपे म्हणाले आहेत. 
 
कोव्हिशिल्डसंदर्भात २० मे नंतरच बोलावं असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. उत्पादन क्षमता आहे तितक्या लसी इतर ठिकाणी पुरवल्या जात असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं आहे, असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

१७० वर्षे जुने ‘हनुमान’ जागचे हालेनात; उज्जैनच्या उभ्या असलेल्या हनुमानजींसमोर सर्व तंत्रज्ञान अपयशी ठरले

कुर्ल्यामध्ये ट्रॉलीवरील नियंत्रण सुटल्याने बाप्पाच्या आगमनसोहळ्यात दुर्घटना, तातडीने विसर्जन

२०२६ च्या आशियाई खेळांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाच्या खेळाडूंच्या निवासव्यवस्थेबाबत माहिती दिली

Oppo A7 Pro लाँच: १२०Hz डिस्प्ले आणि ८,०००mAh बॅटरीची सुविधा; जाणून घ्या किंमत

दुर्गापूजेत मांसाहार चालेल, पण अष्टमीला दारू पिऊ नका, भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांचे विधान

पुढील लेख
Show comments