Festival Posters

कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (19:59 IST)
Onion farmer commits suicide नाशिकच्या देवळा  तालुक्यातील सातवाईवाडी येथे हताश झालेल्या कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने घराजवळच्या विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रताप बापू जाधव (३६) असे आत्महत्या करणा-या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे.
 
प्रतापने यावर्षी कांदा लागवड करून त्याच्यासाठी मोठा खर्च केला होता. मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळाला. त्यातच साठवलेला कांदा खराब झाला. त्यामुळे घेतले कर्ज कसे फेडायचे आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा या विवंचनेत तो होता. त्यातच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सततची नापिकी आणि या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळेही तो चिंतेत होता.
 
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. घरातील लोकांना पहाटे तो न दिसल्यामुळे त्यांनी शोध घेतला असता त्यांचे स्वेटर विहिरी जवळ दिसल्याने ही घटना समोर आली.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: पुणे-मुंबई कॅब प्रवासाला महागाईचा फटका

अमरावतीमध्ये एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

कर्नाटकला नवे मुख्यमंत्री, डीके शिवकुमार यांनी घेतली शपथ, सिद्धरामय्या युगाचा अंत

फिफा विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा २६ सदस्यीय संघ जाहीर

पुणे-मुंबई कॅब प्रवासाला महागाईचा फटका ४०० पर्यंत भाडे वाढ

पुढील लेख
Show comments