Festival Posters

मुंबईकर, फूड अॅपवरून अन्न मागवतात, पण ते येते गलिच्छ झोपडपट्टीतून

गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (07:56 IST)
अगदी खरे आहे. तुम्ही जर ऑनलाईन अन्न मागवत असाल तर तो तुमच्या जीवाशी खेळ होतो आहे.  अॅपवरून मागवणारा आवडीचा पदार्थ किती घाणेरड्या ठिकाणी बनतोय, हे तुम्हाला कळलं तर किळस येणार आहे.  मुंबईत तब्बल ३४७ फुड आऊटलेट्सवर अन्न व औषध प्रशासनने (एफडीए) धाडी टाकल्या असून हे भीषण सत्य समोर आले आहे.  स्विगी, फूडपांडा, झोमॅटो यासारख्या फुड चैन कंपन्यांकडून पुरविण्यात येणारे अन्न अतिशय घाणेरड्या अवस्थेत तयार होत असल्याचे समोर आले आहे. तसेच  स्वस्त, झटपट आणि भरघोस डिस्काऊंटच्या नावाखाली ग्राहकांना अतिशय सुमार दर्जाचं अन्न पुरवत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून येते आहे.  मुंबईच्या बहुतांश झोपडपट्ट्यांमधून अतिशय घाणेरड्या ठिकाणी तयार केलेले अन्न मुंबईभर पुरवठा होत असल्याचे या धाडींच्या निमित्ताने समोर आले आहे.  २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत एफडीएच्या टीमने एकूण ३४७ धाडी टाकल्या असून त्यातील बहुतांश ठिकाणी अतिशय वाईट चित्र होते. धाडींमध्ये तर ११३ दुकानांकडे अन्नपदार्थ तयार करण्याचा परवाना नसल्याचे समोर आले असून, अन्न तयार करण्यासाठी कोणतीही परवाना नोंदणी केलेली नाही. गोरगाव, मालाड, अंधेरी, भांडुप, चेंबुर, प्रभादेवी आदी भागातून या कंपन्यांना अन्नाचे वितरण करण्यात येत होते. बहुतांश अन्न हे मुंबईतील झोपडपट्टीच्या परिसरातच तयार होत आहे. अन्न तयार करण्यात येणारे किचनचे ठिकाण हे अतिशय घाणेरडे असल्याचे धाडी घालणाऱ्या पथकाच्या निदर्शनास आले आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

कमी खर्चात भरपूर नफा मिळवून देणारा एक उत्तम शेती व्यवसाय; गवारीच्या शेंगाची लागवड

LIVE: महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार!

केतन अग्रवाल हत्या प्रकरण: आरोपी सिया गोयल आणि प्रियकराने तीन वेळा हत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिली

ममता बॅनर्जी यांनी पक्षातून ८ नेत्यांना काढून टाकले; बंडखोरांनी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली?

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार! फडणवीस सरकारने विधानसभेत मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments