गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (17:08 IST)

भगवान गडा दसरा मेळावा: पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा नकार

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला होणा-या दस-या मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर येण्यास प्रतिबंध घातले आहेत. भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्याने भगवानगड हा वंजारी समाजाचं अढळ श्रद्धास्थान आहे. पण हाच भगवानगड राजकीय वर्चस्ववादाचं केंद्रबिंदू बनला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ द्यायला तीव्र विरोध केला असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली आहे. 
 
गेल्या वर्षी भगवान गडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.