फडणीस ग्रुपचे महाराष्ट्रातच 8000 च्या आसपास गुंतवणूकदार असून नाशिकमध्येच 2000 गुंतवणूकदार आहेत. एकूण तब्बल 300 कोटींचा किंवा अधिक रुपयांचा हा घोटाळा उघड झाला आहे.झटपट श्रीमंती साठी अनेकांनी लाखो कोट्यावधी रुपये गुंतवले होते. तर या प्रकरणात जवळपास २०० तक्रारी पोलिसांकडे प्राप्त आहेत.
या प्रकरणात ३०/०९/२०१६ रोजी फडनिस ग्रुप ऑफ़ कंपनीज आणि फडनिस इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात अनेक गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी फिर्याद दिली होती त्या अंतर्गत गुरनं २६३/२०१६ ब भादविक ४२०,४०९,४०६, १२० ब सह महाराष्ट्र गुंतवणुकदारांचे हितसंरक्षण कायदा१९९९ कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. मुख्य संशयित ताब्यात आल्याने पोलिसांना तपास योग्य पद्धतीने आणि वेगात करता येणार आहे.