suvichar
✕

बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी 10 कोटी रू निधी मंजूर

Updated: शुक्रवार, 16 डिसेंबर 2016 (10:04 IST)
 
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2016 रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यानाच्या लोकार्पण सोहळयात बाबूपेठ परिसरातील स्टेडियमच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता त्यांनी केली असून बाबूपेठ परिसरातील स्टेडियमच्या सौंदर्यीकरणासाठी 1.50 कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील पठाणपुरा गेट ते बिनबा गेट बायपास रोडच्या बांधकामासाठी 10 कोटी रू. निधी, चंद्रपूर शहरातील बायपास रोड - महादेव मंदिर - समता चौक - नेताजी चौक - बालाजी मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामासाठी 5.50 रू. निधी मंजूर करण्यात आला आहे.
 
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी या आधीही 15 कोटी रू. निधी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला आहे. या आधी दिनांक 15 ऑक्टोबर 2016 रोजीच्या नगर विकास विभागाच्या पत्रान्वये महानगरपालिकांना वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या शीर्षाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी 20 कोटी 12 लक्ष रू. निधी त्यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला असून या अंतर्गत प्रामुख्याने शहरातील कोणेरी अर्थात कोहिनूर स्टेडियमचे नूतनीकरण, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचे नूतनीकरण, पोलीस विभागाकरिता अत्याधुनिक जीमचे बांधकाम, आधुनिक पध्दतीच्या पथदिव्यांची उभारणी आदी विकास कामांचा समावेश आहे.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: सर्वोच्च न्यायालयाकडून मोठी कारवाई, बीएमसी आयुक्तांचा पगार रोखला

हरित भविष्याकडे वाटचाल: २०३० पर्यंत नवीन वाहन नोंदणीत ३०% इलेक्ट्रिक वाहनांचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट

तेलंगणातील खम्मम येथे अपघात! मच्छिमारांना वाचवताना एसडीआरएफच्या दोन बोटी उलटल्या, १० कॉन्स्टेबल बेपत्ता

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ११ महत्त्वाचे निर्णय जाहीर

अमेरिकेच्या निवडणूक निकालांवरून रोहित पवारांचा केंद्र सरकार आणि मोदींवर निशाणा

पुढील लेख
Show comments