suvichar
✕

परप्रांतीय मुद्दा राज विरुद्ध नाना आणि मुख्यमंत्री

Updated: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (15:05 IST)
काय म्हणाला नाना पाटेकर :
हे नुकसान गरिबांचे झाले आहे. मनसेचे फक्त एक वोट गेले मात्र अनेकाचा रोजगार गेला,   ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचं सांगितलं आहे. मला काल कोणीतरी विचारलं की, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरुन हुसकावून लावणं, मारणं योग्य आहे का ? माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यांना भाकरी कमवायचा अधिकार आहे,
 
मुख्यमंत्री देवेद्ब्र फडणवीस :
उत्तर भारतीय आणि अन्य राज्यातून येणा-या लोकांनी  महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतीयांनी आपले योगदान देऊन मुंबईला महान बनवले,  त्यांनी मुंबईला मोठे बनवले आहे.भाषा वादाचा विषय असू शकत नाही. भाषा संपर्काचं माध्यम असून भाषा माणसाला जोडते. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद निर्माण करु नये असे वक्तव्य आता मुख्यमंत्री यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
 
राज ठाकरे यांचे उत्तर 
मुंबई आणि महाराष्ट्र यापूर्वीही महान होता, आहे आणि राहील. महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी आश्रित म्हणून येणाऱ्या परप्रांतीयांची गरज नाही त्यामुळे जेथून आले तेथे परत आज हा   एकाच मार्ग आहे असे मात्र मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.  मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं हास्यास्पद आहे. परप्रांतातील लोक महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात. त्यांच्या राज्यात विकास न झाल्यामुळं ते येतात. आश्रित म्हणून येणारे हे लोक मुंबई, महाराष्ट्राला महान कसं बनवू शकतात, असे देसाई यांनी  प्रश्न उपस्थित केले आहे. 
 
या सर्व प्रकारामुळे आता काही काळ तरी परप्रांतीय मुद्दा तरी गाजणार आहे हे उघड झाले आहे. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments