शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मे 2017 (11:53 IST)

आमदार रमेश कदम यांची पोलिसांवर दादागिरी

ramesh kadam

तुरुंगात असलेल्या आमदार रमेश कदम यांनी जेलमध्ये त्यांनी पोलिसांवर दादागिरी करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. रुटीन चेकअपसाठी रमेश कदम यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात नेलं जात होतं. मात्र कदम रुग्णालयात जाण्यास तयार नव्हते. यावेळी पोलिसांनी व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तसंच पोलिस अधिकाऱ्याने रमेश कदम यांचं म्हणणं लिहून घेण्यास सांगितलं. त्यानंतर रमेश कदम यांनी पोलिसांवर दादागिरी करत शिवीगाळ केली. इतकंच नाही तर पोलिसांना धमकीही दिली. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम अटकेत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केलं.