Dharma Sangrah
✕

सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; 'या' तीन सुट्ट्या झाल्या जाहीर

Updated: बुधवार, 29 जुलै 2020 (10:02 IST)
 
करोनाचा corona प्रादुर्भाव वाढल्यानंतर सुमारे ३० ते ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज सांभाळत त्यांच्याकडून अतिरिक्त काम सांभाळण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्ह्यातील राज्य सरकारी कार्यालयांना तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त सुटी जाहीर केली आहे. याशिवाय एक सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि १८ ऑक्टोबरला घटस्थापनेला राज्य सरकारी कार्यालयांना सुटी असणार आहे.
 
पुण्यातील आकडे चिंता वाढवणारे
पुणे शहर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २६१८ जणांना करोनाची लागण झाल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर करोनाला रोखण्याचे आव्हान आणखी वाढले आहे. दिवसभरात ५९१ जणांना पुण्यात बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले असून शहर जिल्ह्यात ५५ जणांचा मृत्यू झाला आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

मुंबईच्या समुद्रात प्लास्टिक कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी बीएमसीने एका नवीन करारावर स्वाक्षरी केली

महाराष्ट्र सरकारने कोल्हापूरच्या बाहुबली आणि कुंठुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १८.२० कोटी रुपयांना मंजुरी दिली

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाने शिंदे आणि शायना एन.सी. यांचे पोस्टर फाडून नदीत विसर्जित केले

वायू प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र देशातील पहिली सल्फर डायऑक्साइड व्यापार योजना सुरू करणार- मंत्री पंकजा मुंडे

पुढील लेख
Show comments