Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नितेश राणेंना दिलासा

Updated: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:58 IST)
नितेश राणे यांच्याकडे हायकोर्टात जाण्याचा पर्याय आहे. हायकोर्टात ही केस दाखल होईल, त्यावर सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत पोलीस नितेश यांना अटक करू शकतात.
सध्या नितेश राणे हे अनरिचेबल आहेत. पोलिसांना जर त्यांचा ठावठिकाणा लागला तर त्यांना केव्हाही अटक होऊ शकते, असं तज्ज्ञ सांगत आहेत.
मनीष दळवींना परवानगी नाकारली?
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतदार आणि नितेश राणे यांचे कार्यकर्ते मनीष दळवी यांना न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली होती.
संतोष परब हल्ला प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांना मनीष दळवी हवे आहेत. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान बुधवारी (29 डिसेंबर) सरकारी वकिलांनी मनीष दळवी आणि नितेश राणे यांचे पीए राकेश परब यांचे कॉल डिटेल्स सादर केले. यात नितेश राणेंचा सहभाग असल्याचा दावा यावरून वकिलांनी केला.
आता या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसून येतं.
नारायण राणेंना नोटीस
नितेश राणे अनरिचेबल असल्यामुळे त्यांना आणि त्यांचे वडील नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे.
पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींनी नारायण राणेंना विचारले तेव्हा ते म्हणाले, 'नितेश राणे कुठे आहेत हे तुम्हाला का सांगू. नितेश राणे कुठे आहेत, ते तुम्हाला सांगायला मी मूर्ख आहे का?"
 
पण, हेच वक्तव्य आता त्यांना भोवण्याची चिन्हं दिसत असून यासंदर्भात पोलिसांनी नारायण राणे यांना चौकशीची नोटीस पाठवली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली होती. संतोष परब हल्ला प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी नारायण राणे यांना ही नोटीस देण्यात आली होती. पण सर्वात म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा पाहिजे आरोपी म्हणून पोलिसांनी नारायण राणे यांना दिलेल्या नोटीशीत उल्लेख करण्यात आला होता.
या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवरच कारवाईची मागणी केली आहे. 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलवता येत नाही हे पोलीस जाणीवपूर्वक विसरले असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
ते म्हणाले, "सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचा नाही असं ठरवलं आहे. CRPC 160 ची नोटीस देणारे पोलीस हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलवता येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊन घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीत बजावून साक्ष देण्यासाठी बोलवणं हा कायदेशीर अपराध आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदवला जावा." अशी मागणी भाजपने केली आहे.
 
28 तारखेला कोर्टात काय झालं होतं?
या अर्जावर 28 डिसेंबरला चार वाजता सुनावणी सुरू झाली. सुरुवातीला नितेश राणे यांच्यावतीने वकील संग्राम देसाई यांनी तब्बल दीड तास युक्तिवाद केला. हा युक्तिवाद करताना त्यांनी नितेश राणे यांचा या प्रकरणात कोणत्याच प्रकारचा सहभाग नाही असे म्हणणे मांडले.
 
नितेश राणे हे गुन्हा घडला त्या ठिकाणी ना हजर होते, ना त्या भागाच्या दृष्टीक्षेपात होते. शिवाय ज्या दिवशी हल्ला झाला त्या 18 डिसेंबर पासून 26 डिसेंबर पर्यंत नितेश राणे यांनी कणकवली पोलीस स्टेशनला जाऊन पोलीसांच्या चौकशीला उत्तरेही दिली आहेत, असं देसाई यांनी कोर्टापुढे मांडलं.
शिवाय पोलिसांनी या प्रकरणातील सहावा आरोपी सचिन सातपुते याच्या रिमांड रिपोर्ट मध्ये नमूद केलेल्या वर्णनाचा मुद्दा वकील देसाई यानी उचलला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी सचिन सातपुते याने नितेश राणे यांच्या संगनमताने या गुन्ह्याचा कट रचला आणि नितेश राणे यांनी फिर्यादीचा फोटो सातपुते यांना दिला. ती जागा सातपुते याने दाखवली आहे आणि आणि त्या जागेचा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे.
शिवाय नितेश राणे आणि आरोपी सचिन सातपुते यांचा एकत्र फोटोही पोलिसांनी रिमांड रिपोर्टच्या कागदपत्रात जोडलेला आहे .
अशा वेळी आता नितेश राणे यांच्याकडून हस्तगत करण्यासारखे काहीही उरत नाही. तसेच जे काही कॉल डिटेल्स आवश्यक आहेत ते डिटेल्स मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस प्रोवायडर कडून पोलीस घेऊ शकतात त्यामुळे नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा अशी विनंती कोर्टाला देसाई यांनी केली.
हे सांगताना वकील देसाई यांनी तक्रारदार संतोष परब यांच्या जबाबावर आधारीत मूळ FIR हाच कसा राजकीयदृष्ट्या प्रभावित आहे हे अनेक उदाहरणे देऊन न्यायालयाला पटवून द्यायचा प्रयत्न केला. हा युक्तिवाद तब्बल दीड तास चालला.
त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद सुरू केला. वकील घरत यांनी ॲड देसाई यांच्या युक्तिवादातल्या एकेका वाक्याला घेऊन ते खोडून काढण्यास सुरुवात केली.
मुळात संतोष परब यांच्यावरील हल्ला हा एका सुनियोजित कटाचा भाग का आहे आणि त्या कटाचा तपास करण्यात पोलीस नितेश राणेंपर्यंत का पोहोचले आहेत हे घरत यानी मांडण्यास सुरुवात केली.
संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले आरोपी हेच जर अनोळखी असतील तर असे अनोळखी आरोपी कुणाच्या तरी सांगण्यावरूनच हल्ला करण्यास आले असा दावा वकील घरत यांनी केला. आणि असा हल्ला करण्यास सांगण्याऱ्यापर्यंत पोहोचणं हे पोलिसांचं कर्तव्य कसं आहे हे घरत यांनी न्यायालयासमोर मांडलं.
मात्र सरकारी वकिलांना मध्येच कोर्टाने थांबवून अजून तुम्हाला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला.
सरकार पक्षाने अजून किमान दोन तास लागतील असे सांगितले. त्यावर कोर्टाने आता उशीर झालाय उद्या दुपारी ही सुनावणी कोर्ट घेईल असे म्हटले. त्यावेळी संध्याकाळचे साडेसहा वाजले होते.
दरम्यान फिर्यादी संतोष परब यांच्यावतीने आलेले वकील विकास पाटिल यांनी कोर्टाला कमीत कमी माझे म्हणणे तरी आज न्यायालयाने ऐकून मग उरलेलं कामकाज उद्या ठेवावं अशी विनंती केली.
पाटील यांची विनंती मान्य करीत पावणे सात पर्यंत न्यायालयाचे कामकाज चालवले. वकील पाटील यांनी अपल्या म्हणण्यात संतोष परब यांच्यावरील हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग कसा आहे हे न्यायालयासमोर मांडले आहे.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

यवतमाळच्या बोरगाव धरणावर सहलीसाठी गेलेल्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी सेल्फी काढताना बुडाल्या

LIVE: 'कॉकरोच जनता पार्टी' स्वातंत्र्यदिनी हिंगोली जिल्ह्यात शाळा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू करणार

किश्तवारमध्ये मोठा अपघात, महिंद्रा स्कॉर्पिओ चिनाब नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

हातात इंजेक्शन आणि औषधे पण डॉक्टरी पदवी नाही! मुंबईत बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश

'शाळा ठीक करा' अभियान; स्वातंत्र्यदिनी हिंगोलीमध्ये सीजेपीकडून घोषणा

पुढील लेख
Show comments