रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (11:51 IST)

दहीहंडीसाठी नियम जाहीर

dahi handi 600
पुणे- यंदा दहीहंडीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. यासाठी नवीन नियम जाहीर करण्यात आले आहे. तशा सूचनाही मंडळाला देण्यात आल्या आहेत. हा दहीहंडी उत्सव शुक्रवारी साजरा होणार आहे. नियमानुसार मंडळांनी रात्री दहाच्या आत दहीहंडी फोडायची आहे. 
 
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात फौज तैनात असून स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच एसआरपीएफ, जलद कृती दल, होमगार्ड, दामिनी पथक, गुन्हे शाखा विशेष शाखा यांचा ताफा साध्या वेशात असतील. 
 
यंदा पोलिसांनी तालमींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत. तसेच दारू पिणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच महिलांच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पथके तैनात करण्यात आली असल्याचे सांगत आहेत.
 
नियमानुसार मंडळांनाही ध्वनी मर्यादेचे पालन करावे लागेल. ध्वनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाणार आहे.
आवाजाची व्याप्ती मोजण्यासाठी पोलिस यंत्रणेसह उपस्थित राहणार आहेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळाला पोलिसांची मदत घ्यावी लागणार असून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या गर्दीत अडकणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे.