सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (21:37 IST)

शिवसेना कोणाची याचा फैसला 7 ऑक्टोबरला

uddhav shinde
शिवसेना कोणाची याचा फैसला लवकरच होणार असून ठाकरे आणि शिंदे गटाच्या लढाईत आता 7 ऑक्टोबर ही तारीख निर्णायक ठरणार आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना 7 ऑक्टोबरपर्यंत आपली बाजू मांडायला सांगितले आहे. अंधेरी पोटनिवडणूक जाहीर असून त्याआधीच हा फैसला होण्याची चिन्ह आहेत.
 
सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरु आहे. घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला मागच्या सुनावणीमध्ये दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनंतर आता निवडणूक आयोगही कामाला लागले असून आता ठाकरे आणि शिंदे गटाच्या लढाईत आता 7 ऑक्टोबर ही तारीख निर्णायक ठरणार आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना 7 ऑक्टोबरपर्यंत आपली बाजू मांडायला सांगितले आहे.
Edited By - Ratandeep Ranshoor