Dharma Sangrah

राष्ट्रीय महामार्ग वरील सिन्नर-खेड टप्प्यासाठी पथकर सुरु

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पुणे नाशिक महामार्गवरील  सिन्नर ते खेड या दरम्यानच्या टप्प्यासाठी दोन ठिकाणी पथकर सुरु करण्यात आला आहे असे प्रकल्प संचालक पी जी खोडसकर यांनी कळविले आहे.
 
सिन्नर ते खेड या शहरांच्या दरम्यानच्या 138 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी फक्त104 किमी लांबीचे 75टक्के काम पूर्ण झाले आहे. आरेखन, बांधा, वित्तसहाय्य, प्रचालन(वापरा) व हस्तांतरीत करा(डीबीएफओटी) या तत्वावर बांधण्यात झालेल्या या कामासाठी शासन व बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या करारातील तरतूदीनुसार हा पथकर लागू करण्यात आला आहे. हा महामार्ग नाशिक ,अहमदनगर व पूणे या जिल्हयातून जात आहे. यामधील हिवरगाव पावसा व चाळकवाडी या दोन ठिकाणी टोल वसूली करण्यात येणार आहे. उर्वरित काम ऑगस्ट 2017 पर्यंत पूर्ण होणार आहे.
 
चाळकवाडी येथील पथकरचे दर रुपये पुढीप्रमाणे आहेत.
 
कार जिप आदी हलक्याय वाहनासाठी एकेरी वाहतूक 40 रु. परतीची वाहतूक 60 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 20 रु. हलक्या वाणिज्य वाहनांसाठी (एल एम व्ही) एकेरी वाहतूक 65 रु. परतीची वाहतूक 95 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 30 रु. ट्रक व बस वाहनांसाठी एकेरी वाहतूक145 रु. परतीची वाहतूक 215 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 70 रु.
 
हिवरगांव पावसा येथील पथकरचे दर रुपये पुढीप्रमाणे आहेत.
 
कार जिप आदी हलक्याय वाहनासाठी एकेरी वाहतूक 70 रु. परतीची वाहतूक 105 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 35 रु. हलक्या वाणिज्य वाहनांसाठी (एल एम व्ही) एकेरी वाहतूक 115 रु. परतीची वाहतूक 170 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 55 रु. ट्रक व बस वाहनांसाठी एकेरी वाहतूक260 रु. परतीची वाहतूक 395 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 130 रु.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

'मुक्त संवाद' आयोजित १३ व्या बालनाट्य महोत्सवाची शानदार सांगता; १६० हून अधिक बालकलाकारांचे सादरीकरण

LIVE: राहुरी-शनी शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्

नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा येथे भीषण रस्ते अपघातात चालकाचा मृत्यू; पाच जण गंभीर जखमी

१० लाखांच्या बजेटमध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार; पेट्रोल आणि CNG मधील टॉप पर्याय

IND vs AFG : भारताने कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला

पुढील लेख
Show comments